Screenshot_20231122_141530

खानापूर : तालुक्यात माती, वाळू व इतर खनिज पदार्थांची अवैध वाहतूक सुरू असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी पोलिस, महसूल आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा न दाखविता वाहने जप्त करून असा आदेश तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी बजावला आहे. यामुळे बेकायदा वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

तहसीलदारांनी मंगळवारी (दि. २१) जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे, एमएमआरडी कायदा १९५७ कलम ४, ४(१)ए, २१ आणि २२ नुसार परवानगीशिवाय माती, वाळूमिश्रित माती आणि वाळूची बेकायदेशीरपणे वाहतूक करणारी वाहने आणि वाहनमालकांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. तथापि, या बाबत अलीकडेच तालुक्यात तपासणी केली असता, अनेक वाहने खाण व भूगर्भ विज्ञान खात्याचा अधिकृत परवाना न घेता माती, वाळूमिश्रित माती व इतर खनिज पदार्थांची अवैध वाहतूक करीत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही नुकसान होत आहे.

भविष्यात असे प्रकार आढळून आल्यास नियमानुसार वाहने जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करावी. त्याचा सविस्तर अहवाल आपल्या कार्यालयाला पाठवावा. खानापूर, कणकुंबी, लोंढा, नागरगाळी, गोलिहळ्ळी वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनाही आपापल्या कार्यक्षेत्रातील अशी वाहने जप्त करून कारवाई करावी, असे आदेशात नमूद आहे.

महसूल निरीक्षक, तलाठ्यानांही अधिकार

विनापरवाना माती व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे. खानापूर व नंदगड पोलिस निरीक्षकांना धडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तालुक्यातील सर्व उपतहसीलदार, महसूल निरीक्षक आणि तलाठी यांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. वाहन जप्त करून ते नजीकच्या पोलिस स्थानकात जमा करण्याचे आदेशही बजावण्यात आले आहे

वीट व्यावसायिकाना ही बसणार फटका!

खानापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आहेत. बहुतांश वीट व्यावसायिक शाडू मिश्रीत, शाडूयुक्त माती वाहतूक करतात अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याने दुसरीकडे माती आणून केली जाते. पण अशा वाहनांना देखील टारगेट करून या आदेशाअंतर्गत त्रास देण्याचे प्रकार होणार आहेत त्यामुळे वीट व्यवसायिक ही या आदेशामुळे धास्ती निर्माण झाली आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us