खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर मारुती नगरामध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री स्वयंभू हनुमान मंदिराचा जिर्णो द्वार येथील नागरिकांनी केला असून याच मंदिराचा लवकरच उद्घाटन समारंभ हाती घेण्यात येणार आहे.
मारुती नगर येथील श्री स्वयंभू हनुमान मंदिर हे या भागातील जागृत देवस्थान आहे या देवस्थान मुळेच या भागाला मारुती नगर असे नाव देण्यात आले आहे. या स्वयंभू मारुती अर्थात हनुमान मंदिराचा महिमा लक्षात घेता या भागातील नागरिकांनी या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प घेतला. जवळपास 20 ते 25 लाख रुपये खर्च करून या मंदिराची उत्तम उभारणी करण्यात आली आहे. मंदिराचे संपूर्ण बाहेरील काम पूर्ण झाले असून मंदिराच्या गर्भ गुढीचा चौकट कार्यक्रम व उद्घाटन कार्यक्रम बाकी आहे. येत्या महिन्याभरात या मंदिराचे उर्वरित काम पूर्ण करून मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती येथील कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी खानापूर लाईव्ह शी बोलताना दिली. या मंदिरात दररोज नित्यआरती महापूजा व हनुमान चालीसा पठण अधिक कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. लहान थोरासह आबालवृद्धही दररोज नित्यर्थी भजन कार्यक्रमात सहभागी होत असतात एकूणच या मंदिराच्या उभारणीमुळे या भागाचे वैभव वाढले असून लवकरच या मंदिराचा उद्घाटन मोठ्या थाटात करण्याचा निर्णय येतील उत्सव कमिटी व बांधकाम कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.