‘ जांबोटी/ प्रतिनिधी : कुसमुळी नजीक शेतवडीत काम करताना नदीच्या प्रवाहात वाहून गेलेला’ तो ‘ बैल चार तासाच्या शोधाच्या अथक प्रयत्नानंतर मिळाला. त्यामुळे त्या शेतकऱ्याने सुटकेचा निस्वास सोडला आहे. खरंतर सध्या शेती हंगामासाठी बैल हा शेतकऱ्याचा मोठा कणा आहे. पण शेतीत काम करताना डोळ्यादेखत चाळीस ते पन्नास हजाराचा बैल वाहून गेल्याने बैलजोडी मालक संतोष घाडी यांचे हात पायाच गळले होते. कुसमळी ब्रिजापासून खाली शंकर पेठ पर्यंत त्या बैलाचा शोध केल्यानंतर तब्बल पाच ते सहा किलोमीटर अंतरावर तो बैल एका झुडपात अडकल्याचे दिसून आले सदर बैलाच्या पोटात पाणी गेल्याने अस्वस्थ झाला आहे लागलीच डॉक्टरला बोलावून त्या बैलावर उपचार करण्यात आले बैल जिवंत मिळाल्याने त्या शेतकऱ्याने मात्र सुटकेचा निस्वास सोडला.