
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज गुरुवारी पार पडली. यामध्ये नूतन अध्यक्षपदी सुनील पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. हलगा ग्रामपंचायत नेहमी एक चर्चेचा विषय बनले आहे. मावळते अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर विद्यमान समितीतील सात सदस्यांनी अविश्वास संमत केला. न्यायालयीन वादात गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत असलेल्या या ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीवर अखेर पडदा पडला आहे. आज निवडणूक अधिकारी कृषी सहाय्यक निर्देशक मंजुनाथ मावीनकोप यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. सकाळी 11 वाजता संस्थेच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात आली. यावेळी सुनील पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रणजीत पाटील, पांडुरंग पाटील, मंदा पठाण, स्वाती पाटील, इंदिरा मेदार, नजीया सनदी सदाशिव उपस्थित होते. तीन सदस्य गैरहजर होते. सुनील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर फटाक्याची अतिशबाजी करून आनंदसह साजरा करण्यात आला. नूतन अध्यक्षांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.