खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी ;
खानापूर तालुक्यात भात पिकानंतर ऊस पिक हे मुख्य पीक मानले जाते. मलप्रभा नदीकाठ प्रदेशात मोठ्या प्रमाणात ऊस पिकाचे उत्पादन घेतले जाते शिवाय माळवड जमिनीतही अलीकडच्या काळात बोरवेल आधारित शेती जमिनीत ऊस पिकांना अधिक प्राधान्य दिले जाते. पण याच ऊस पिकावर जंगली डुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. खानापूर तालुक्याच्या डोंगरपट्ट्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमीन आहेत. या डोंगराळ प्रदेशातून जंगली डुक्कर, गवि रेडे सह जंगली प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागतेच. पण त्यापेक्षाही खानापूर तालुक्याच्या मध्यावधीत असलेल्या नदी काठाच्या प्रदेशात कुपटगिरी, बलोगा, येडोगा, चापगाव सहपट्ट्यात मोठ्या प्रमाणात जंगली डुकरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे दमान आलेल्या ऊस पिकात या जंगली डुकरामुळे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. नदीकाठाच्या प्रदेशात असलेल्या अनेक ठिकाणी अशा जंगली डुकरांचा मोठा वावर झाला आहे. रात्रीच्या वेळी अशा जंगली डुकरांना हुसकावण्यासाठी गेल्यास त्यांच्यापासूनही शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. दोनच दिवसापूर्वी येडोगा परिसरात जंगली डुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. येथील नागाप्पा अंधारे, पुंडलिक चौगला, नारायण देवलतकर अशा अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यासाठी वन खात्याने या जंगली प्राण्यांच्या वर बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
गवि रेड्यांचाही धुमाकूळ!
खानापूर तालुक्याच्या जंगलपट्ट्यात गविरेड्यांचा कळप मोठ्या प्रमाणात वाढला आहे प्रत्येक घनदाट जंगल डोंगर पठारीच्या प्रदेशात गविरेडे बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत ऊस पिकांचे यामुळे मोठे नुकसान होत आहे शिवाय भात पिकातही गंभीरड्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे सकल भागातील भात पिके मोठ्या प्रमाणात नुकसान करत त्यामुळे या जंगली प्राण्यापासून शेतकऱ्यांना शेती रे नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ आली जंगली जंगली डुक्कर अथवा गवि रेडे यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी हायबॅक ठिकाणी अर्थात झटका करंट लावून शेती जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु चतुर जंगली प्राण्यांमुळे यावरही मात करत शेती पिकाचे नुकसान ते प्राणी करत असल्याने शेतकऱ्यांना हातबल होण्याची वेळ आली आहे.