IMG-20230403-WA0004

खानापूर : कर्नाटक भू नोंदणी आणि मुद्रांक (सब- रजिस्टर) खात्याच्या वतीने प्रत्येक तालुका पातळीवरील सर्व उपनिबंधक कार्यालयात कावेरी सॉफ्टवेअर-2.0 या नवीन धोरणानुसार आता भू नोंदणी योजना अमलात आली आहे. सदर कावेरी सॉफ्टवेअर -2 ऑनलाईन नोंदणी अंतर्गत सर्वसामान्यांना आता घरबसल्या मालमत्ता नोंदणी सुलभ होणार आहे.
या कावेरी सॉफ्टवेअर 2 चा खानापुरातही सोमवारी शुभारंभ करण्यात आला. सदर योजनेचा शुभारंभ बेळगाव जिल्हा नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे नूडल अधिकारी रिजवान अहमद महत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खानापूर उपनोंदणी अधिकारी राजशेखर मुक्कानावर, ऑपरेटर सादिक गीवाले, शशिकला पाटील, दीपक देसाई,एस जी गवस याचं खानापूर शहरातील बोंड रायटर्स प्रतिनिधी उपस्थित होते.

कर्नाटक भू नोंदणी आणि मुद्रांक विभागात यापूर्वी ऑपलाईन द्वारे कागदपत्रांची पूर्तता करून उप नोंदणी कार्यालयात दाखल प्रक्रिया केल्यानंतर सदर कागदपत्राची पडताळणी होऊन नोंदणी केली जात होती. यामुळे अनेक लोकांना हेलपाटे मारावे लागत होते. शिवाय जमिनींचे व्यवहार अथवा कोणतीही मुद्रांकि व्यवहार करताना अनेक प्रकारचे पेपर जोडून द्यावे लागत होते.पण आता ऑपलाईन ऐवजी ऑनलाइन योजना अमलात आल्यानंतर प्रत्येक मालमत्ता धारकाला घरबसल्या आपल्या मालमत्तेची नोंदणी करता येते. सदर कावेरी सॉफ्टवेअर 2 आता पूर्ण वापरासाठी सज्ज असून राज्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयांच्या कामकाजातही बदल होणार आहे.


त्यामुळे आता खानापूरच्या मिनी विधान सौध येथील तालुका उपनिबंधक सब-रजिस्टर कार्यालयांसमोर नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मध्यस्थांना हजारो रुपये मोजावे लागणार नाहीत, सर्व काही सोपे आणि पारदर्शक होत आहे. याशिवाय, मालमत्ता नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सुरळीत होईल.त्यामुळे नोंदणी आणि इतर सेवा ‘कावेरी-2’ वेबसाइटवर लॉग इन करून घरबसल्या मिळवता येतील,
फसवणुकीवर अंकुश:
कावेरी-2.0 सॉफ्टवेअर सर्व जमीन, ई-मालमत्ता, ई-मालमत्तेशी जोडले जाईल. मालमत्तेच्या नोंदणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांसाठी हे एकात्मिक सॉफ्टवेअर आहे. बनावट कागदपत्रे तयार करून नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्यास ते पकडले जातील. यामुळे सुरक्षेसोबतच नोंदणी प्रक्रिया सुलभ होईल. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाते. या वेब आधारित सॉफ्टवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टममध्ये कोणतीही अडचण राहणार नाही. त्यामुळे नोंदणी दरम्यान डेटा एंट्रीच्या चुका अथवा अडचण होणार नाही. नोंदणी प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती पाठवली जाते. मालमत्ता नोंदणीशी संबंधित सर्व समस्या व गैरसोयी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कायमस्वरूपी सोडविल्या जातील, त्यामुळे या कावेरी सॉफ्टवेअर टू योजनेअंतर्गत भू नोंदणी व मुद्रांक खात्याशी संलग्न नोंदणी प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे. मात्र या योजनेत विवाह नोंदणी साठी नेहमीची प्रक्रिया कायम लागू राहणार आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूणच या कावेरी सॉफ्टवेअर 2 योजनेमुळे आता बऱ्याच अंशी या रजिस्टर कार्यालयाशी संबंधित व्यवहारावर चांगलाच चाप बसेल अशी आशा आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us