खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
कर्नाटक शासनाच्या वतीने 2024 25 या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आधुनिक शेतीपयोगी अवजार पावर टिलर साठी सबसिडी प्रक्रिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शासनाचा लाभ मिळत नाही यासाठी सरकारने चालू वर्षात सबसिडी अनुदान मंजूर करावे अशी मागणी खानापूर तालुका शिवस्वराज जनकल्याण संघटनेच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
तहसीलदारांना निवेदन देताना….
या निवेदनात म्हटले आहे की, 2024-25 च्या चालू हंगामासाठी सरकारने शेतकऱ्यांना अनुदानावर पॉवर टिलरचे वितरण अद्याप सुरू केलेले नाही. आणि मागील वर्षी अर्ज केलेल्यांना अजून सबसिडी मिळाली नाही.. कृषी विभागाकडून चालू वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले असून, शेतकरी अनुदानाच्या पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करत असले तरी, प्रत्येक मंडळात अपवाद वगळता पॉवर टिलरसाठी केवळ दहा अर्जांवरच कार्यवाही होणार असल्याचे निदर्शनास आले आहे. खानापूर आणि जांबोटी सर्कलसाठी पंधरा अर्ज आणि उर्वरित अर्जदारांना पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तालुक्यात सध्या रोप लागवडीची कामे जोरात आहेत. शेतात चिखल करण्यासाठी या यंत्राची अत्यंत गरज असते परंतु सबसिडी मिळत नसल्याने भाडेतत्त्वावर घेऊन शेतीतील कामे करावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूृदंड बसत आहे. करिता शासकीय सबसिडीच्या अनुदानाची प्रक्रिया लवकरात लवकर मंजूर करून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पावर ट्रेलर किंवा इतर यंत्रणा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावेत. कृषी यांत्रिकीकरण (SMAM) या किसान योजना योजनेअंतर्गत केंद्र सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80% पर्यंत अनुदान देत आहे. यामुळे खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त (८०% पर्यंत) अनुदान द्यावे अशी विनंती आणि निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांना पाच लाख रुपये द्या..
खानापूर तालुका शिवस्वराज जनकल्याण संघटनेच्या वतीने खानापूर तहसीलदारांनाही एक निवेदन सादर करण्यात खानापूर तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली आहे अनेक गरीब लोक बेघर झाले आहेत अशा लोकांचा सर्वे योग्य प्रकारे व्हावा व पूर्णतः जमीन दोस्त झालेल्या घरांना किमान पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे. की, सन २०२४ सालच्या जुन व जुलै महिण्यात खानापूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झालेली आहे. त्यामुळे नागरीकाना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा बेघर झालेल्या नागरीकांना पाच लाख रूपयाहुन अधिक रक्कम मंजुर करावी. तसेच अधिकारी पाठवुन पंचनामा करावा. तसेच सध्या बांधकाम साहित्याची रक्कम दुप्पटीने वाढली आहे. तेव्हा मागील दराने नुकसान भरपाईची रक्कम न देता. सद्याच्या वाढत्या महागाईची रक्कम लक्षात घेऊण नुकसान भरपाईची रक्कम वाढुन द्यावी. अशी मागणी निवेदनाव्दारे केली.
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यानी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठवुन देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई, कार्याध्यक्ष रमेश धबाले, सरचिटणीस बाळासाहेब शेलार, रणजित पाटील, मारूती पाटील, व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.