- येळळूर : अलीकडच्या काळात शिक्षणाला फार महत्त्व आहे. शिक्षण हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे विद्यार्थी जीवनात शिक्षणात नेहमी सातत्य असणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी परीक्षेला घाबरून न जाता सामोरे जावे, प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या देशाचा उत्तुंग भरारी मारणारा युवक आहे. यासाठी अलीकडच्या काळात नवतरुण विद्यार्थी आरोग्याने, समृद्धीने आणि शिक्षणाने बळकट झाले पाहिजेत. यासाठीच गेल्या 14 वर्षापासून खानापूर तालुका तसेच बेळगाव भागात कन्नड व मराठी व्याख्यानमाला सुरू करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम खानापूर ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू आहे. येळूर सारख्या मोठ्या गावातही अशी ज्ञानवर्धिनी प्रतिसाद ची व्याख्यानमाला सुरू होत असताना आम्हाला याचा अत्यानंद होतो याचा सदुपयोग सुज्ञ शिक्षकांच्या कडून दहावीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा व प्रत्येक विद्यार्थी या भागाचा , देशाचा शिखर बनावा असे मौलिक विचार ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक पीटर डिसोजा यांनी व्यक्त केले. शनिवारी त्यांनी बेळगाव तालुक्यातील येळूर श्री चांगळेश्वरी विद्यालयात आयोजित व्याख्यानमाला सेंटरला भेट दिली त्याप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलत होते. यावेळी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे कार्यवाह निवृत मुख्याध्यापक व्हि. बी. होसूर, एम डी पाटील, निवृत मुख्याध्यापक् एन एम देसाई ,धामणेकर, कानशिडे भोगन सर उपस्थित होते. व्याख्यानमालेतील समन्वय शिक्षक आक्षीमणी व श्रीमती दिवटे यांचा यावेळी पीटर डिसोजा सरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.