खानापूर:
2022 23 शैक्षणिक वर्षातील दहावी परीक्षा उद्या 31 मार्च पासून प्रारंभ होत आहे. खानापूर तालुक्यात यावर्षी दहावी परीक्षेसाठी 3706 परीक्षार्थी असून 3558 विद्यार्थी रेगुलर आहेत. यामध्ये 1785 विद्यार्थी तर 1773 विद्यार्थिनींचा समावेश आहे. तर 123 विद्यार्थी व 25 विद्यार्थिनी असे 148 विद्यार्थी रिपीटर आहेत.
खानापूर तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावी परीक्षेसाठी चोख बंदोबस्तात हाती घेण्यात आला असून परीक्षेची तयारी हाती घेण्यात आली असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी श्रीमती राजेश्वरी कुडची यांनी गुरुवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, शिक्षण खात्याच्या निर्देशनानुसार तालुक्यात दहावी परीक्षेसाठी पूर्ण यंत्रणा हाती घेतली असून शिक्षण खात्याच्या मार्गसूचीनुसार सर्व बाबी हाताळण्यात येत आहेत. परीक्षा केंद्रावर कोणताही गैर व्यवहार अथवा कॉपी होऊ नये यासाठी 3 भरारी पथक व 16 बैठक पथके स्थापन करण्यात आली आहे. तर 7 फिरते पथक आहेत.
तालुक्यात एकूण 16 ठिकाणी परीक्षा केंद्र असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर, आरोग्य सुविधा पोलीस यंत्रणा ठेवण्यात आली आहे. दहावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचवण्यासाठी विशेष मार्ग सूची तयार करण्यात आली आहे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश देणे, याबरोबर परीक्षा केंद्रात आवश्यक सुविधा राखण्यात आली आहेत. असे त्यांनी सांगितले.
31मार्च पासून 15 एप्रिल पर्यंत होणार परीक्षा
2022 _23 सालातील यशस्वी परीक्षेचा पहिला पेपर दी. 31 मार्च रोजी सकाळी 9.30 ते दुपारी एक पर्यंत होणार आहे. यानुसार 31 मार्च रोजी प्रथम भाषा, 03 एप्रिल रोजी गणित, 06 एप्रिल रोजी द्वितीय भाषा, 10 एप्रिल रोजी विज्ञान, 12 एप्रिल रोजी तृतीय भाषा आणि 15 एप्रिल रोजी समाजशास्त्र याप्रमाणे परीक्षा होणार आहेत.