- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : विद्या भारती शिक्षण संस्था यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेत तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप संचलित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या 33 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
- गेल्या 16 व 17 सप्टेंबर रोजी दहा जिल्ह्यातून एकूण 800 स्पर्धकांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. यामध्ये 14 वर्षांखालील मुले व मुली गटात कुमार सोहन हलगेकर याने100 व 200 मीटर धावणे , लांब उडी मध्ये पहिला आला आहे. त्यामुळे त्यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिप फटकावले आहे. श्रीनिवास प्रभू डिस्कस थ्रो मध्ये पहिला स्वाती पाटील डिस्कस थ्रो मध्ये दुसरा रोहन गावकर अडथळा शर्यतीत दुसरा झेर बागवान शॉटकट मध्ये तिसरा तर रिले या सांघिक खेळात मुलांचा गट पहिला आला आहे त्यामध्ये सोहन हलगेकर परशराम व रोहन बेळगावकर प्रथमेश यांनी भाग घेतला होता. सोहन हलगेकर 100 मीटर धावण्यात 3 प्रथम क्रमांक पटकावला आहे
- 17 वर्षांखालील मुले व मुली मध्ये दर्शन तुरमुरी डिस्कस तो मध्ये पहिला प्रत्युष नाईक, 100 मीटर धावणे तिसरा, प्रदीप राठोड गोळा फेक तिसरा, विवेक पाटील 400 मीटर अडथळाच्या शर्यतीत तिसरा, ईशांत 1500 मीटर धावणे तिसरा, वैष्णवी जोशीलकर तिहेरी उडीत, तिसरा, मृदुला पाटील हातोडा फेक मध्ये तिसरा, प्रांजल राव रिले दुसरा असा क्रमांक पटकावले आहेत. या स्पर्धेत पहिला व दुसरा क्रमांक पटकावलेल्या सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवरील 5 ऑक्टोंबर ते 7 ऑक्टोंबर पर्यंत तेलंगणा हैदराबाद येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्य सहशिक्षिका व मॅनेजमेंटच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.