खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ म्हणजे शिक्षण. प्रा. शंकर गावडा यांचं प्रतिपादन. होणकल सी आर सी अंतर्गत प्रतिभा कारंजी स्पर्धा उत्सहात संपन्न.. माणिकवाडी हायर प्रा. शाळेत या प्रतिभा कारंजी स्पर्धाचं आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमांची सुरवात झाली. प्रा. शंकर गावडा यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रुमेवाडी शाळेचे iमुख्या. एस डी पाटील, crp मॅडम,sdmc अध्यक्ष कुमान्ना पाटील, आणि सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेत होणकल क्लस्टर मधील सोळा शाळांनी सहभाग दर्शवला होता.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. शंकर गावडा म्हणाले की जीवन ही एक पवित्र गंगा आहे. जीवन सुसंस्कारीत करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. आपल्या खानापूरच्या मातीत सुद्धा अवकाशात झेप घेण्यासाठीची प्रतिभा लपलेली आहे. हे युवा शास्त्रज्ञ् प्रकाश पेडणेकरांच् उदा. देऊन सांगितलं. ढोकेगाली शाळेचे मुख्या. करंबळकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एस डी.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिकवाडी शाळेचे मुख्या. करंबळकर sir यांनी तर आभार. रुमेवाडी शाळेचे सहशिक्षक जोतिबा घाडी यांनी केले.ही स्पर्धा पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्या. शिक्षक वर्ग शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष, सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले…