- जांबोटी: दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित राजर्षीशाहू हायस्कूल ओलमणी ता. खानापूर यांच्या वार्षिक क्रीडा उत्साहात संपन्न झाल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहू राऊत होते. हायस्कूलचे मुख्याध्यापक सी.एस कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम हायस्कूलचे क्रीडाशिक्षक श्री सी आर पाटील यांनी मुलांचे पतसंंचालन घेऊन पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर क्रीडा ध्वजारोहण ह भ प रामू बाळू पाटील बेळवटी यांच्या हस्ते करण्यात आला. क्रीडा ज्योत दीपक नावलकर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आले. दीप प्रज्वलन नारायण क पाटील,भाऊ कुदेमानकर ,राकेश कांबळे, अमित देसाई ,पुंडलिक ल पाटील, गंगाराम पांडुरंग पाटील गोवा यांनी केले. यावेळी गंगाराम पाटील व शाहू राऊत यांनी खेळ हा शारीरिक वर्धक प्रकार असून शालेय जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता घेता आरोग्यासाठी आवश्यक खेळ खेळून यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे असे विचार विद्यार्थ्यांना पटवून दिले. सूत्रसंचालन ए जी सावंत यांनी केले. आभार प्रदर्शन श्री सिंह पाटील यांनी केले. शाळेतील एन. व्ही पाटील , टी पी, मजगावी. सौ वर्षा चौगुले कार्यक्रम पार पाडण्यासाठी बरेच परिश्रम घेतले. आभार सी. आर.पाटील यांनी मांडले