खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील सावरगाळी येथे लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. या निमित्ताने गेल्या सात दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन स्पर्धात्मक कार्यक्रम व सत्कार आधी कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचप्रमाणे शाळकरी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्या रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सात वाजता खुल्या व आठवी खालील विद्यार्थ्यांसाठी लहान गट अशा दोन गटात भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटासाठी अनुक्रमे 2500,1500,1000,500 तर लहान गटासाठी 1500, 1000 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेमध्ये खुल्या गटासाठी 1)कुणाच्या डोक्यात शेती धोक्यात?, 2) भ्रष्टाचाराच्या किडीवर कोणते कीटकनाशक फवारावे?, 3)व्यवस्थेला सुरंग लावणारे संत विद्रोही तुकाराम, तसेच 4)डिजिटल इंडिया चे भविष्य हे विषय ठेवण्यात आले आहेत. तर लहान गटासाठी 1)युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज 2) माझा बाप शेतकरी 3)आम्ही सावित्री होती म्हणून..4) मोबाईल शाप की वरदान ..! असे विषय ठेवण्यात आले असून खुल्या गटासाठी सात मिनिटे ते लहान गटासाठी पाच मिनिटे वेळ ठेवण्यात आला आहे. तरी याचा खानापूर तालुक्यातील भाषण स्पर्धा आणि लाभ घ्यावा असे आवाहन गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले हे अधिक माहितीसाठी 7204246715 किंवा 9740961284 या क्रमांकावर संपर्क साधावा.