IMG_20231227_142432

सोलापूर : साईंच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. बुधवार 27 डिसेंबर रोजी पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावानजीक फिसरे रस्त्याला कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात चारचाकी वाहनातील 8 पैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावला आहे. मृत भाविक हे कर्नाटक राज्यातील असल्याचे माहिती समोर आली आहे. श्रीशैल चंदेशा कुंभार (वय 56, गुलबर्गा), शशिकला श्रीशैल कुंभार (वय 50, गुलबर्गा) आणि ज्योती दिपक हिरेमठ (वय 38, बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, शारदा दिपक हिरेमठ (वय 70, हुबळी) यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

मृत हे कर्नाटक राज्यातील:

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक साईच्या दर्शनासाठी निघाले होते. करमाळा तालुक्यातील सालसेकडून तवेरा गाडी ने शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते. कंटेनर हा फरशी घेऊन करमाळ्याकडून सालसेच्या दिशेने निघाला होता. पहाटे पावने सहा ते सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या गाड्यांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला तर सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या गाड्यांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला तर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली उपडी पडली. भीषण अपघाताच्या आवाजाने गावातील युवक बचाव कार्याला धावून आले. तवेरा आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने जोरात आवाज झाला. अपघाताचा आवाज येताच पांडे गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर चारचाकी एका अंगावर करून जखमींना बाहेर काढले. प्रसंगावधान राखून या युवकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करून मदतकार्य सुरू ठेवले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us