IMG-20260519-WA0012


खानापूर : तालुक्यातील तोपिनकट्टी गावच्या होतकरू विद्यार्थी सोहम सतीश हळदणकर याने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 625 पैकी तब्बल 616 गुण संपादन करत जिल्ह्यात मराठी विभागातून अव्व्लआला आहे. त्याच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे मराठी विद्यानिकेतन शाळेसह कुटुंब व संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोहमच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शिक्षक मित्रपरिवाराच्या वतीने त्याच्या स्वगृही जाऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सोहमने सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि प्रबळ जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे त्याचे वडील सतीश हळदणकर सर यांनी सांगितले. आजच्या स्पर्धात्मक युगात मेहनत, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा संदेशही यावेळी देण्यात आला. सोहमचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या सत्कार प्रसंगी श्री बाळासाहेब चापगावकर, श्री के. एच. कौंदलकर, श्री बी. ए. अळवणी, श्री पी. जी. पाखरे, श्री एल. व्ही. गुरव, श्री एन. एल. शिवणगेकर, श्री बापू दळवी, श्री रमेश कवळेकर, श्रीमती वैशाली काशीद मॅडम, श्रीमती पी. एम. खांबळे मॅडम तसेच सोहमचे वडील श्री सतीश हळदणकर व हळदणकर आणि बांदिवडेकर कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहमच्या या भव्य यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही तो उच्च शिक्षणात असेच यश संपादन करून समाजासाठी आदर्श ठरो, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us