Screenshot_20241031_192339

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

लककेबैल येथील प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघाचे सचिव प्रकाश पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून त्यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोसायटीच्या आजी, माजी संचालकासह गावातील तिघेजण अशा सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार सहा जणांना अटक करण्यात आल असून एक जण फरारी असल्याचे समजते.

याबाबत माहिती की, लक्केबैल प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाचे सचिव प्रकाश पाटील यांनी मंगळवारी दुपारी सोसायटीच्या सभागृहात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांना बेळगाव येथे दाखल करण्यात आले होते. पण उपचाराअभावी बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान प्रकाश पाटील केलेल्या आत्महत्या मागे सोसायटीच्या काही आजी, माजी संचालक व गावातील काहींचा संबंध असून त्यांच्या धमकीमुळे व आर्थिक व्यवहारामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याची तक्रार प्रकाश पाटील यांची पत्नी लक्ष्मी पाटील यांनी केली आहे. याप्रकरणी खानापूरचे मंडळ पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश एम अधिक तपास करत आहेत.

प्रकाश पाटील यांच्याकडून सदरी व्यक्तीनी दहा लाख रुपये घेतले होते. पण ते देण्यास टाळाटाळ केल्याने मानसिक ताण घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे. यानुसार खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरारी आहे. गेल्या दोन दिवसापासून या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. आत्महत्या केलेल्या ठिकाणी प्रकाश पाटील यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती असे समजते. त्यावरून तसेच त्यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोसायटीच्या एका माजी अध्यक्षसह एक माजी संचालक, दोन माजी संचालक व लक्केबैल व लोकोळी गावातील अन्य तिघांचा समावेश आहे. बुधवारी रात्री उशिरा या बाबत पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल झाली. त्यानंतर गुरुवारी दुपारी प्रकाश पाटील यांचा मृतदेह गावी आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us