खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: चापगाव ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या आल्लेहोळ , शिवोली परिसरात एका बिबट्याचा वावर असल्याचे चर्चेत आहेत. बुधवारी रात्री नऊच्या सुमारात चापगाव हडलगा रस्त्यावर सदर बिबट्याने ठाण मांडून बसल्याचे येथील शेतकऱ्यांनी पाहिले. सदर बिबट्याचा गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी वावर होता शेतवडीत राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची कुत्रीच नाहीशी झाल्याने शेतकऱ्यात याचा दाट संशय होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास प्रत्यक्षात हडलगा चापगाव रस्त्यावर रात्री नऊच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात दहा ते पंधरा कुटुंबे या ठिकाणी शे शेतवाडीत वास्तवात आहेत.. त्यातच बिबट्याचे दर्शन झाल्याने येथील शेतकरी वर्गाला अंधारानंतर बाहेर पडणे भीतीचे निर्माण झाले आहे. यासाठी वन खात्याने याची तातडीने दखल घेऊन या भागात गस्त वाढवावी व बिबट्याला बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.