Oplus_16777216
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : चापगाव ता. खानापूर येथे श्रीकृष्ण मंदिरात गोमतेची पाषाण मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उद्या शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या आज शनिवार दि. 17 रोजी गो माता मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. वारकऱ्यांच्या टाळ, महिलांच्या भजन, तसेच सनई चौघड्याच्या नादात गावभर असा मिरवणूक सुरू होता. चापगाव येथे फाउंडेशन गल्लीमध्ये श्रीकृष्ण मंदिराची उभारणी 2012 मध्ये करण्यात आली आहे. या ठिकाणी सूंदर अशी श्रीकृष्णाची पाषाण मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. या मूर्तीच्या पाठीमागे गोमतीच्या मूर्तीची उणीव होती. ती भरून काढण्यासाठी येथील मंडळांनी नव्याने गोमातेची पाषाण मूर्ती तयार केली असून सदर मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा आज पासून दोन दिवस चालणार आहे.