बिडी प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात निवडणूक प्रचाराला वेग आला असून राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्षासह समिती व अपक्ष उमेदवारांनी जोर लावला आहे. प्रामुख्याने खानापूर तालुक्यात चर्चेत असलेले शिवसेनेचे उमेदवार श्रीमान के. पी. पाटील यांनीही आपल्या प्रचाराला जोरात सुरुवात केली आहे.
श्रीमान के. पी. पाटील यांना शिवसेनेचे मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर त्यांनी अधिकृतरित्या मतपत्रिकेत नोंदणी झाल्यामुळे त्यांनी आपला प्रचार जोरात सुरू केला आहे. एकीकडे शिवसेनेच्या वरिष्ठांनी शिवसेनेचा समितीला पाठिंबा दर्शवला आहे. पण इकडे अधिकृतरित्या मतपत्रिकेत शिवसेनेचे मशाल हे चिन्ह नोंदणी झाल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार के. पी. पाटील यांनी आपला प्रचार सुरूच ठेवला आहे.
रविवारी खानापूर तालुक्याच्या विविध भागात त्यांनी आपला प्रचार दौरा केला प्रामुख्याने दुपारच्या फेरीत हेबाळ येथे अनेक मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या त्यानंतर बिडी येथे त्यांनी आपला प्रभावी प्रचार केला बाजारपेठेत अनेक मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या की पी पाटील हे युवा कार्यकर्ते असल्याने त्यांनी आपल्या आतापर्यंत केलेल्या कार्याचा कार्याची दखल लक्षात घेता त्यांनी जनमानसात आपले वैयक्तिक स्थान राखले आहे त्यामुळे त्यांनी आपल्या प्रचाराला वेग आला असेल बिडी व परिसरात त्यांचा आज झंझावती प्रचार झाला. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते तसेच समर्थक मतदार उपस्थित होते.