
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : शितो-रियो कराटे डो असोसिएशनच्या वतीने नेपाळ, काठमांडू येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत खानापूर तालुक्यातील शिवोली येथील मारुती विलास पाटील यांने सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मारुती पाटील यांचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक कन्नड शाळा चापगाव येथे झाले तर माध्यमिक आठवी ते दहावीपर्यंत शिक्षणसिद्धिविनायक इंग्रजी मीडियम स्कूल खानापूर येथे तर दहावी व बारावीचे शिक्षण इंटरनॅशनल पब्लिक स्कूल युवा सायन्स अॅकॅडमी कोगनोळी येथे झाले. त्यांचे वडील विलास पाटील हे चापगाव ग्रा. पं. मध्ये वॉटरमन म्हणून काम करतात. या यशासाठी त्याचे सर्व परिसरातून कौतूक होत आहे. या स्पर्धेसाठी त्याला त्यांच्या युवा सायन्स अॅकॅडमी कोगनोळी कॉलेजचे प्रा. अनमोल पाटील, मार्गदर्शक अविनाश पाटील प्रशिक्षक सुमित खोत व आई वडील यांचे प्रोत्साहन लाभले.