
khanapur: शिवठाण ता. खानापूर. येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित शिवठाण येथील श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक श्री पी ए पाटील यांनी सर सी व्ही रामन या शास्त्रज्ञांच्या फोटो पूजन करून कार्यक्रमाला चालना दिली. त्यानंतर विज्ञान विषय शिक्षक व्ही बी पाटील यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व व उद्देश सांगितला. 1928 साली डॉक्टर सी व्ही रमण यांच्या संशोधन प्रभावाचा शोध लागला. त्यासाठी 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले. त्यानंतर 1986 साली भारत सरकारने 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित करण्यात आला. तसेच विज्ञानाच्या महत्त्व विषयी जनजागृती करणे व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे हा हेतू असतो हे समजून दिले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक पी.ए. पाटील म्हणाले; विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान याबद्दल जागरूक राहणे . वैज्ञानिक दृष्टिकोन तंत्रज्ञान निरीक्षण निष्कर्ष याबाबतीत संशोधनात्मक वृत्ती जोपासली पाहिजे. असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनामध्ये पोस्टर तयार करणे वैज्ञानिक प्रयोग रांगोळी रेखाटन व शाळेतील रसायने उपकरणे मॉडेल यांचे सादरीकरण करण्यात आले होते. तसेच येथील प्रायमरी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री एन व्ही नाईक श्री एन जी गावडा. सविता काजूनेकर मॅडम बी व्ही पाटील सर यांचे सहकार्य लाभले शेवटी वंदे मातरम ने प्रदर्शन कार्यक्रमाची सांगता झाली.