खानापूर :प्रतिनिधी खानापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, निजद, समिती व भाजपा अशी चौरंगी लढत होत असताना शिवसेनेने यावेळी उमेदवारी दिली आहे. श्रीमान के. पी. पाटील यांनी शिवसेनेच्या बळावर आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून, मशाल’ या चिन्हावर त्यांनी उमेदवारी भरण्याचे यापूर्वीच घोषित केले होते. यानुसार सोमवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आपल्या समर्थकासह भरला. येथील जांबोटी सर्कल पासून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. व शिवस्मारकात छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यानंतर निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अर्ज भरताना त्यांच्यासमवेत शिवसेना बेळगाव संपर्कप्रमुख बंडू केरवाडकर, तालुका अध्यक्ष नारायण राऊत, शिवसेना युवा अध्यक्ष मोहन गुरव, माध्यम प्रमुख दत्तात्रय हेगडे, त्यांचे बंधू जयराम पाटील,कार्यकर्ते महादेव गुरव, मारुती कल्याणी, रवी कडबी, दत्ता पाटिल, सुरेश पाटिल, नामदेव गावडे, रामचंद्र मयेकर, लक्ष्मन मनोळकर, बाळकृष्ण मयेकर, प्रतीक पाटिल आदी उपस्थित होते