खानापूर: खानापुरात 2023 च्या विधानसभा निवडणुकी शिवसेना निवडणूक लढवणार आहे. या खानापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर कोळींद्रेकर, महादेव शिरोड, व शिवसेना राज्य उपाध्यक्ष के पी पाटील उप जिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना के. पी. पाटील म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यावेळी कर्नाटकात ११० जागांवर निवडणूक लढवणार आहे त्या अनुषंगाने खानापुरात शिवसेनेची उमेदवारी आपणाला म्हणजे के पी पाटील यांना दिली आहे त्यामुळे खानापूर तालुक्यात शिवसेनेची ताकद यावेळी आम्ही दाखविणार अहोत त्या अनुषंगाने खानापुरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन येथील बेळगाव पणजी महामार्गावरील मनेरीकर बिल्डिंगमध्ये करत आहोत यावेळी कोणत्याही परिस्थितीत शिवसेना खानापुरात मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. तालुक्यातील शिवसैनिकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी खानापूर तालुक्यात पूर्वीपासून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत पण या शिवसैनिकांना भक्कम नेतृत्व नसल्यामुळे कार्यकर्ते स्वीकारले आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मानणारा मोठा समाज या भागात असल्याने यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली ‘मशाल’ या चिन्हावर आपण निवडणूक लढवत आहोत. यासाठी के. पी. पाटील यांची निश्चित झाली असून अधिकृत उमेदवारी ही वरिष्ठांनी दिली आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष नारायण राऊत, शिवसेना युवा अध्यक्ष मोहन गुरव, माध्यम प्रमुख दत्तात्रय हेगडे, कार्यकर्ते महादेव गुरव, मारुती कल्याणी, रवी कडबी, दत्ता पाटिल, सुरेश पाटिल, नामदेव गावडे, रामचंद्र मयेकर, लक्ष्मन मनोळकर, बाळकृष्ण मयेकर, प्रतीक पाटिल आदी उपस्थित होते