चापगाव /प्रतिनिधी : चापगाव येथील छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवरायांना अभिवादन करून जयघोष करण्यात आला. यावेळी आरोळी मठाची पूज्य श्री कलैया स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये शिवरायांची मंत्र पटनाने पूजन झाले त्यानंतर राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष एम आर पाटील यांच्या हस्ते शिवपूजन झाले. यावेळी पूजाश्री कलया स्वामी तसेच एम आर पाटील यांचा यावेळी राजे छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. उपस्थित्यांचे स्वागत पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी करून दिले.
यावेळी गावातील अनेक युवक बलिदान मास पाळत आहेत त्यानिमित्त महिनाभर हा बलिदान मास अनेक युवकांनी प्रेरणादायी पाळावा त्यानंतर या मासाची सांगता राजे राजे ठिकाणी पायी चालत जाऊन करण्याचा संकल्प घेण्यात आला. या कामी ग्रामपंचायत माजी सदस्य व उद्योजक मारुती चोपडे यांनी युवकांना प्रोत्साहन दिले आहे. यावेळी रोशन पाटील, माजी सभापती सयाजी पाटील, उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ, संतोष कदम, विलास धबाले, हनुमंत पाटील, नारायण पाटील यासह अनेक जण उपस्थित होते.
