खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- चापगाव येथील छत्रपती शिवाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवरायांना अभिषेक व महापूजा झाली. त्यानंतर शिवगर्जना, ध्येयमंत्र , मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित टिपरी डान्स, भाषणे तसेच पाळणा गीत झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एम आर पाटील, कार्याध्यक्ष मारुती चोपडे तसेच सैनिक एकनाथ पाटील, कार्तिक पाटील यांच्या हस्ते अभिषेक झाला. तर ग्रामपंचायत सदस्य नागराज येळूरकर ,माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धबाले, प्रगतशील शेतकरी बाजीराव पाटील, पंच कमिटीचे अध्यक्ष नारायण गोदी ,ह भ प मष्णू सुतार, ग्रामपंचायत सदस्य नजीर सनदी, अर्जुन पाटील, वामन मादार, रोशन पाटील, पिराजी कुऱ्हाडे, अभी पाटील आदींच्या हस्ते मूर्ती पूजा झाली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळकरी विद्यार्थी धारकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. सायंकाळी 6 वाजता चापगाव गावात जल्लोषी मिरवणूक काढण्यात आले.