Home » करंबळ : शिवगर्जना ही मनाला ऊर्जा देणारी; ढोल-ताशांचा गजर विजयाचे प्रतीक! – आमदार विठ्ठल हलगेकर

करंबळ : शिवगर्जना ही मनाला ऊर्जा देणारी; ढोल-ताशांचा गजर विजयाचे प्रतीक! – आमदार विठ्ठल हलगेकर

file_00000000681c8211bd072f84d030f850

शिवगर्जना ही मनाला ऊर्जा देणारी; ढोल-ताशांचा गजर विजयाचे प्रतीक! – आमदार विठ्ठल हलगेकर

करंबळ येथे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ कार्यक्रमात शिवगर्जना ढोल-ताशा पथकाचा दशकपूर्ती सोहळा थाटात संपन्न

खानापूर / प्रतिनिधी : ढोल-ताशांचा गजर हा प्रत्येकाच्या मनात ऊर्जा, उत्साह आणि विजयाची प्रेरणा निर्माण करणारा असतो. विशेषतः शिवगर्जनेचा निनाद युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करतो. करंबळ येथील शिवगर्जना ढोल-ताशा पथकाने गेल्या दहा वर्षांपासून हिंदुत्वाची प्रखर ज्योत आणि शिवरायांच्या विचारांचा जागर कायम ठेवत खानापूर तालुक्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देत शिवरायांच्या विचारांची प्रेरणा देण्याचे कार्य या पथकाने यापुढेही अखंडितपणे सुरू ठेवावे, असे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले.

करंबळ येथे शिवगर्जना ढोल-ताशा पथकाच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या भव्य कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक राजाराम नागाप्पा पाटील होते. प्रारंभी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष तथा युवा नेते देवानंद घाडी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन बेळगाव जिल्हा श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुस्कर, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई-जांबोटीकर, समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष तथा अधिवक्ता ईश्वर घाडी, समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, माजी तालुका पंचायत सदस्य महादेव घाडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशा वाद्यांचे पूजन भाजपचे जिल्हा रयत मोर्चा उपाध्यक्ष तथा महालक्ष्मी शुगरचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धेत कांस्यपदक मिळवून पुढील स्तरासाठी निवड झालेल्या कु. श्रावणी सुधीर पाटील हिचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच कन्नड चित्रपट अभिनेते चैतन्य यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

व्यसनमुक्तीसह उच्चशिक्षित युवक घडवा! – रमाकांत दादा कोंडुस्कर

यावेळी बोलताना रमाकांत दादा कोंडुस्कर म्हणाले की, आजच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक युवक हा शिवरायांचा मावळा आहे; मात्र व्यसनाधीनतेच्या आहारी जाणारा युवक स्वतःच्या आणि समाजाच्या भविष्याचे नुकसान करीत आहे. त्यामुळे माता-भगिनींनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. व्यसनमुक्ती आणि उच्च शिक्षण यांच्या माध्यमातूनच आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकते. शिवरायांचे विचार आत्मसात करून आजच्या युवकांनी सक्षम आणि आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी निरंजन सरदेसाई, धनश्री सरदेसाई, प्रसाद पाटील (गर्लगुंजी) आणि अभिनेते चैतन्य यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला आबासाहेब दळवी, खानापूर गोवा बँकेचे चेअरमन अमृत शेलार, व्हाइस चेअरमन मेघश्याम घाडी, भाजप नेत्या सुनीता पाटील, उपसभापती सुरेश देसाई, पुंडलिक पाटील, विजय गुरव, मल्लाप्पा मारीहाळ, चेतन मनेरीकर, भरमानी पाटील, रणजीत पाटील रमेश ढबाले पिराजी कुऱ्हाडे, दत्ता बेळगावकर सतीश घाडी परसराम ठोंबरे,भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी के एम घाडी यांनी आभार मानले

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us