- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- खास दसऱ्याच्या निमित्ताने दोड्डहोसूर् तालुका खानापूर येथील पंच समिती व वारकरी संप्रदाय व विविध मंडळाच्या वतीने येत्या गुरुवार दि. 26 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता एका बैलगाड्याची चाके न बनता बैलजोडीने गाडा पळवण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण महादेव पाटील राहणार आहेत. या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. या शर्यतीत लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये ही शर्यत ठेवण्यात आली असून मोठ्या गटांमध्ये अनुक्रमे 31000, 25000,21000,19000,16000 अशी 16 बक्षिसे तर लहान गटांमध्ये 11000,9001,7501,6501 अशी बारा बक्षीस ठेवण्यात आले आहेत. तरी खानापूर तालुक्यातील तरी बैल जोडी मालकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असावा म्हणून मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहिती साठी 8105612986, किंवा 9980842642 श्री संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.