IMG_20230628_210324

राजश्री शाहू महाराजांचे विचार सर्व भारतीयांनी जर घेतले तर जागतिक महासत्ता भारत होऊ शकतो : कवी प्रा. निलेश शिंदे

*समता, बंधुता यांची शिकवण देणारे राजश्री शाहू महाराज : कवी प्रा.निलेश शिंदे :

भारतीय बौद्ध महासभा, एमए समिती, अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद-एल्गार परिषद, शाहू फुले आंबेडकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री छ. शाहू महाराज यांची 149 वी जयंती आणि त्यानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन


बेळगाव: , 26 जून :आरक्षणाचे जनक: शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, आरक्षण, समता, आणि बंधुता अशा विविध गोष्टींसाठी त्यांना आठवले जाते. पण अनेकांना शाहू महाराज यांच्याविषयी पुरेसे माहिती नाही. छत्रपती शाहू महाराजांनी राज्याची सूत्रे हातात घेताच त्यांनी राज्य आणि समाजावरील ब्राह्मणांचे वर्चस्व मोडून काढले होते. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. महाराजांच्या वडिलांचे नाव जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते. तर त्यांची आईचे नाव राधाबाई होते समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज 149 वी जयंती साजरी केली जात आहे. सामान्य लोकांना सामाजिक न्याय मिळावा. प्रत्येक नागरिकांना समान न्याय मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांना आठवले जाते. महाराजांची आज 149 जयंती आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. महाराजांच्या वडिलांचे नाव जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते. तर त्यांची आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे मूळ नाव हे यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, हे कोल्हापूरचे शाहू व चौथे साहू अशा विविध नावाने प्रसिद्ध होते. 26 जुलै 1902 रोजी भारतीय इतिहासात त्यांनी ते केले जे कोणीही कल्पना केली नसेल. शाहूजी महाराजांनी 26 जुलै रोजी चित्पावन ब्राह्मणांच्या तीव्र विरोधानंतर आपल्या राज्यात दलित-मागासांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण लागू केले. म्हणूनच शाहूजींना आधुनिक आरक्षणाचे जनक म्हटले जाते. पुढे बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांनी भारतीय संविधानात शाहूजींनी लागू केलेल्या आरक्षणाचा विस्तार केला. आधुनिक भारतातील जातीवर आधारित हे पहिले आरक्षण होते. त्याचप्रमाणे
महाराजांनी हिंदू वारसा हक्काचा निर्बंधावर मोठा निर्णय घेतला. शूद्रांची अनौरस संतती आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रिवर्णांची अनौरस संतती यांच्या वारसाहक्कातील तफावत महाराजांनी नष्ट केली.महाराजांनी केलेले कार्य : शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांचे वृत्तपत्र मूकनायकला सहकार्य केले. शाहू महाराजांना सामाजिक कार्य करणारा राजा असं म्हटलं जाते. त्यांनी समाजातील अनेक रुढी, परंपरा नष्ट केल्या. यामुळे राज्य सरकार शाहू महाराजांचा जन्म दिवस हा 2006 पासून”सामाजिक न्याय दिन”
म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा, स्त्री पुनर्विवाह कायदा, आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा करत त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला होता. असे प्रतिपादन कवी प्रा. निलेश शिंदे यांनी “”शाहू महाराज जीवनकार्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्व एक चिंतन”” या विषयावर विशेष असे मार्गदर्शन केले

भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखा, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद आणि एल्गार परिषद बेळगाव, शाहू फुले आंबेडकर सोशल फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांची 149 वी जयंती आणि त्यानिमित्त विशेष व्याख्यानाच्या आयोजन करण्यात आले होते प्रमुख वक्ते म्हणून बेळगांव येथील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा. के. डी. मंत्रेशी आणि कवी प्रा. निलेश शिंदे बेळगांव यांनी “”शाहू महाराज जीवनकार्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्व एक चिंतन”” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन सदाशिवनगर बेळगांव येथील बुद्ध विहार आंबेडकर भवन या ठिकाणी करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष समाजसेवक यमनाप्पा पी. गडीनाईक उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते निंगाप्पा विठ्ठल जाधव , समितीचे नेते आणि माजी नगरसेवक अनिल पाटील , रमाकांत मेत्री यांनी फोटो पूजन केले.

दीप प्रज्वलन सेक्रेटरी राजेंद्र कांबळे, प्रमुख वक्ते प्रा. के.डी. मंत्रेशी, प्रा. निलेश शिंदे, जीवन कुरणे, समितीचे कार्यकर्ते नारायण सांगावकर , सुधिर चौगुले, महादेव तळवार, लक्ष्मण नाईक, मल्लिकार्जुन राशिंगे, अनंत कोलकार यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विद्यानिकेतन शाळेचे शिक्षक सहदेव कांबळे यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत गायन केले.
यावेळी माजी नगरसेवक अनिल पाटील, एपीएमसी चे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, प्रा. के. डी. मंत्रेशी, प्रा निलेश शिंदे यांनी वेगवेगळ्या शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित जीवन पटावर आधारित मार्गदर्शन केले.

स्वागत नारायण सांगावकर यांनी केले. प्रस्ताविक शाहू – फुले-आंबेडकर सोशल फाउंडेशनचे सचिव भीमा कांबळे यांनी केले. परिचय नागेंद्र कांबळे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे व जीवन कुरणे यांनी केले. तर सागर गुंजीकर यांनी आभार मानले. यावेळी आनंद कोडसंगी, गंगाराम अंकलगी, लक्ष्मण नाईक, महादेव तलवार सिद्धाप्पा कोलकर, अनंत कोलकर, , एम आर शेट्टी, चांगदेव हुवाप्पणावर,
मरप्पा हुवाप्पणावर, जोतिबा निंगाप्पा पाटील, अजित पाटील, श्रीधर पाटील,सिद्धाप्पा कांबळे,
विजय पाटील, उदय पाटील, नारायण पाटील, तसेच वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

काही महत्त्वाचे मुद्दे बातमीत आवश्यक असतील तर हे खालील प्रमाणे मुद्दे घ्यावेत ही विनंती….!

भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे पाहिजे असेल तर कृपया घ्यावे

राजश्री छत्रपती शाहू महाराज आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपये दंड ठोटावणारा राजा, कला, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा,

राज्यकारभाराची सूत्रे

इ. स. १८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.

शाहू महाराजांनी केलेले कार्य :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी सहकार्य केले. चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. २६ जुन हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे.

शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला, वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा केला. स्त्री पुनर्विवाह कायदा केला. आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले. कोल्हापूर येथे “शाहपूरी” ही गुळाची बाजारपेठ सुरु केली. शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वस्तीगृहे सुरु केली. अस्पृश्यांसाठी “मिस क्लार्क” हे वस्तीगृह स्थापन केले.१५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ अशा शब्दांत त्यांना गौरविलेले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us