यडोगा: नुकताच खानापूर तालुका पातळीवरील माध्यमिक शाळांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खानापूर येथील सर्वोदय विद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. या खेळात यडोगा येथील प्राथमिक मराठी शाळेच्या मुला मुलींच्या दोन्ही खो खो संघाने घवघवीत यश संपादन करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे आता त्यांची जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याचप्रमाणे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्राथमिक मराठी शाळा यडोगा विद्यार्थ्यांचे वैयक्तिक खेळातही यश मिळवले असून यामध्ये
शेखर अंधारे 600 मीटर धावणे प्रथम क्रमांक, प्रियांका देवलतकर 600 मीटर धावणे द्वितीय क्रमांक , जोशना हंगिरकर 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक मिळवला आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. एम. के. गुरव, शिक्षक श्री. पि. एस. पाटील, शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष श्री गणपती देलतकर, श्री महादेव हंगीरकर, रमेश हंगिरकर, गंगाराम हंगिरकर, विठ्ठल सनदी, नारायण अंधारे, मल्लापा हलगेकर, तुकाराम सनदी, महेश निलजकर, रामचंद्र देवलतकर, किसन खांबले,विष्णू देवलतकर तसेच सर्व यडोगा ग्रामस्थ यांचे मार्गदर्शन लाभले..