बेलगाम : अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, खानापुर, बैलहोंगल, कित्तूर, चिक्कोडी आणि निपाणी येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केले होते.
जिल्ह्यातील अनेक शाळेच्या इमारतींना गळती लागलेली आहे. याचप्रमाणे शाळा परिसरात पाणी साचलेले आहे. पावसाचा वाढलेला जोर आणि यामुळे उद्भभणाऱ्या समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुरुवारी २५ आणि शुक्रवारी २६ जुलै असे दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, यासह खानापुर, बैलहोंगल, कित्तूर, चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे सुट्टीचा प्रस्ताव पाठवला होता त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेत पुन्हा दोन दिवस सुट्टी वाढवली आहे. बेळगाव शहर आणि तालुक्यात सोमवारपासून शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे गेले तीन दिवस शाळेला न गेलेले विद्यार्थी आता आगामी आणखी दोन दिवस घरातच राहणार आहेत त्यामुळे पावसाळी सुट्ट्या एकूण पाच दिवस झाल्या आहेत. बेळगाव शहरातील काही शाळांनी सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन क्लासेस सुरुवात केलेली आहे तर काही शाळा शनिवार आणि रविवार देखील शाळा भरवून सुट्टीचा अभ्यासक्रम भरून काढण्यात येणार आहे.