खानापूर/ प्रतिनिधी : खानापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत ग्राहकांची नेहमीचीच ठरलेली आहे. या ठिकाणी पासबुक इंट्रीसाठी एक खिडकी काउंटर उभारण्यात आले आहे.परंतु या ठिकाणी ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता तासंतास ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे एक काम अन् तीन.. तीन ग्राहकांची झाली आहे. यासाठी स्टेट ऑफ बँक इंडियाच्या लीड मॅनेजरनी खानापूर येथील शाखेच्या ठिकाणी आणखी एक खिडकी काउंटर सुरू करून ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करतील का असा प्रश्न बँक ग्राहकातून व्यक्त केला जात आहे.
खरंतर, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खानापुरातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक अग्रेसर मानली जाते. बहुतांश सरकारी नोकर वर्ग व चांगल्या उद्योजकांचे खाते व व्यवहार अधिक प्रमाणात या बँकेमध्ये आहेत. पण या बँकेत ग्राहकांची अनेक वेळा गोची होताना दिसते. या ठिकाणी बँकिंग व्यवहार हाताळण्यासाठी अनेक काउंटर आहेत. पण कॅश काउंटरच्या ठिकाणीही बऱ्याच वेळा रांगा लावाव्या लागतात. शिवाय बँकेच्या अंतरंग व्यवहारातही एखादे बँक खात्यावरील चुकीची नोंद दुरुस्ती करायची असल्यास एका कामासाठी चार चार काउंटर फिरावे लागते. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना बँकेचा आर्थिक व्यवहारच कळत नाही त्यामुळे बँकेचा व्यवहार नको रे बाबा म्हणण्याची वेळ ग्राहकांच्या वर येत आहे. करिता ग्राहकांची होणारी गैरसोय बँक व्यवस्थापक दूर करतील का ? असा प्रश्न ग्राहकांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे बँकेच्या आवारात एक खिडकी काउंटर उभारण्यात आले आहे. या काउंटरवर ग्राहकांनी आपली पासबुक स्वतःहून इंट्री करण्यासाठी उभा आहे. परंतु या ठिकाणी पासबुक इंट्री करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दोन ते तीन तास ताटकळत राहण्याची वेळ येत आहे. अनेकांना बँक अकाउंट हाताळण्यासाठी मोबाईलचा वापर करण्याची सोय आहे. पण ज्यांना मोबाईल हाताळता येत नाही व बँक खात्यावरील व्यवहाराची देवाण-घेवाण करण्यासाठी पासबुक अनेकांना लाभदायी ठरते. मात्र हेच पासबुक इंट्री करून घेण्यासाठी दिवसभर तात्काळ राहण्याची वेळ येते. यामुळे बँकेच्या या कारभाराबद्दल ग्राहकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एक काम, तीन तास थांब:
खानापुरातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही अग्रगण्य बँक मानली जाते. त्यामुळे अनेक ग्राहकांचे व्यवहार या ठिकाणी आहेत. पण ग्राहकांची होणारी गैरसोय मात्र दूर करण्यासाठी आतापर्यंत या शाखेतील व्यवस्थापकानी प्रयत्न केले नाहीत. एखादे पासबुक एन्ट्री करायची असेल तर देऊन तीन, चार तास ताटकळत राहावे लागते. बँकेत एखाद्या नावातील बदल किंवा पत्ता बदल करायचा असल्यास तीन-चार काउंटरवर फिरावे लागते. खरंतर बँकेत एखादा अर्ज केला की तातडीने एकाच काउंटरवर ह्या सुविधा होणे गरजेचे आहे. पण या बँकेतील होणाऱ्या गैर सोयीमुळे बँकेचा ग्राहक वैतागला आहे. यावर विचार होणे गरजेचे आहे.
मन्सूर खानापुरी, सामाजिक कार्यकर्ते, खानापूर