खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी :
खानापूर तालुक्यातील येडोबा येथील भाऊ केसरी स्पोर्ट्स च्या वतीने बेळगाव जिल्हा मर्यादित 17 वयोगटातील पुरुषांच्या व महिलांच्या खो-खो स्पर्धा उद्या शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत या स्पर्धा करिता पुरुष गटामध्ये अनुक्रमे 10,001, 5001, 2001 अशी तर महिला गटाकरिता 10001,5001, 2001 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य रमेश हंगीरगेकर यांच्या हस्ते, तर मैदानाचे पूजन उद्योजक शंकर चौगुले यांच्या हस्ते होणार आहे.
महिला सामन्यांचे उद्घाटन सामन्याचे उद्घाटन येडोबा येथील सीआरपीएफ मध्ये नियुक्त झालेल्या भगिनी कुमारी मयुरी व कुमारी माधुरी मल्लाप्पा अंधारे यांच्या तर पुरुष सामन्यांचे उद्घाटन अजहर हेरेकर शेडू कॉन्ट्रॅक्टर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेश सनदी राहणार आहेत. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून जिल्ह्यातील खो खो संघानी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 70 90 91 36 21 श्री संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.