खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील लोंढ्याजवळ असलेल्या सातनाळी, माचाळी गावाला नदीच्या पुलाचा धोका दरवर्षी भेडसावितो. मुसळधार पावसाने नदी ,नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि सातनाळी, माचाळी गावाला जोडलेल्या पुलावर चार फुट पाणी येऊन गावचा संपर्क तुटला. सातत्याने असे प्रसंग सातनाळी, माचाळी गावच्या नागरीकाना सतावत असतात. या गावचा एकमेव असलेला हा पूल गेली चार दिवस पाण्याखाली आहे. येथून शाळकरी मुलं शेतकरी आपला जीव मुठीत धरून पिझ्झा करत आहेत याचा पाठपुरावा दरवर्षी देखील नागरिक करत असतात पण अजून कोणीही याची दाद घेतलेले नाही.
त्यामुळे पावसाळा आला सातनाळी माचाळी गावच्या नागरीकाना मोठे संकट येते. संपर्क तुटतो. त्यामुळे पावसाळ्यात कित्येक दिवस गावातच थांबावे लागते. अशावेळी अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. गावात आजारी व्यक्ती असलीतर कोणतीच सोय होत नाही. त्यामुळे मृत्यूशी झुंज द्यावी लागते. इथून जवळ असलेले लोंढा प्राथमिक केंद्र ही अपुरेमुळे निरुपयोगी आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून सातनाळी माचाळी गावच्या नागरीकानी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी च्याकडे आपली गार्हाणी सातत्याने मांडून आजतागायत कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे नागरीकाना गेल्या कित्येक वर्षांपासूनपावसाळ्यात मरणयातना सोसाव्या लागतात. “आता तरी देवा मला पावशील का ?अशी परिस्थिती येथील लोकांची झालेली आहे . संबंधित अधिकाऱ्याने याची पाहणी करावी आणि उंच पुल उभारून द्यावा. जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य प्रमाणे होईल.अशी मागणी या गावच्या नागरीकातुन होत आहे.