IMG-20230914-WA0089
  • खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : शाळांमध्ये वनस्पती श्यामला योजना, 50 लाख रोपे लावण्याची योजना अमलात आणली आहे. शैक्षणिक हे अवस्थेत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती व्हावी या उद्देशाने वनस्पती श्यामला प्रकल्प राबवण्याचा कर्नाटक सरकारने निर्णय घेतला असून या योजनेअंतर्गत खानापूर तालुका पातळीवरील वनस्पती शामला कार्यक्रम खानापूर येथील सरकारी प्रौढ माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची वनाधिकारी नागराज शाळा कमिटीचे उपाध्यक्ष चंद्र काद्रोळी शिक्षक संयोजक कमार आधी उपस्थित होते .
  • यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले निसर्ग आणि पर्यावरण याचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा अभियान यापूर्वीपासूनच राबवण्यात येत आहे. दरवर्षी वन खाते सामाजिक वनीकरण असे विविध उपक्रम राबवले जातात. त्याच पद्धतीचा शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये वनस्पती शामला प्रकल्प कार्यक्रम राबवून लहान वयातच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. त्यासाठी हा कार्यक्रम प्रत्येक शाळेत राबवण्याचा देश राज्य सरकारने आयोजित केला आहे. े या अनुषंगाने गुरुवारी येथील सरकारी प्रौढ शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. साक्षरता विभाग, पर्यावरण व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या वनस्पती श्यामला कार्यक्रमात मुलांसमवेत रोपे लावून ते बोलत होते.
  • राज्यात शिक्षकांचा चांगला वर्ग असून त्यांचा उपयोग करण्यासाठी सर्व उपाययोजना पुरेशा प्रमाणात करण्यात आल्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक आणि पदव्युत्तर महाविद्यालयांच्या आवारात जागा असल्यास विद्यार्थी स्वत: रोपटे लावतात व त्यांचे संगोपन करतात, अशी अभिनव योजना आखण्यात आली आहे. मुलांनी स्वतः रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे, असे ते म्हणाले.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us