
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
तालुक्यातील सण होसुर भंडरगाडी येथील ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची यात्रा उद्या बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी पसून जल्लोषात सुरू होत आहे यानिमित्ताने गुरुवारी पहाटे सूर्योदयाच्या मुहूर्तावर सात वाजून दहा मिनिटांनी देवीचा अक्षता सोहळा होणार आहे. त्यानंतर पंचांच्या व पुजारीच्या मानाच्या ओटी भरणी झाल्यानंतर देवी गाजत वाजत भंडरगाळी या माहेरगावी पोहोचणार, व त्या ठिकाणी पहिल्या ओटी घेणार आहे. पुन्हा सन्नहोसूर गावामध्ये देवी आगमन होऊन गावात जल्लोषी मिरवणूक व घरोघरी दर्शन व ओठ्या भरणी होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता देवी गदगेवर विराजमान होऊन बळ फिरवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला पुराण येणार आहे. गावच्या मध्यभागी असलेल्या गदगा मंदिराच्या ठिकाणी यात्रेची जय तयारी हाती घेण्यात आली असून गदगा मंदिराच्या समोर शामियाना घालण्यात आला आहे. त्याच ठिकाणी नऊ दिवस यात्रा भरणार आहे.
गुरुवारी रात्री” दर्डासिंग दरोडा”! नाट्यप्रयोग

श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे नाटकांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजता चार अंकी सामाजिक नाटक दर्डासिंग दरोडा या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, लैला कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. शिवाय या यात्रा काळात दररोज रात्री विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या यात्रा उत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने तसेच संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.