
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : तालुक्यातील सन्नहोसूर -भंडरगाळी श्री महालक्ष्मी यात्रा बुधवारपासून उत्साहात प्रारंभ झाली आहे. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी यात्रा 2025 विशेष अंकाचे प्रकाशन शुक्रवारी येथील यात्रा कमिटी तसेच पंच कमिटीच्या हस्ते करण्यात आले. खानापुरातील सुप्रसिद्ध समांतर क्रांती तसेच खानापूर लाईव्ह वेबसाईटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या या यात्रा पुरवणी विशेष अंकाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या दोन्ही गावच्या यात्रेची परंपरा व यापूर्वीच्या झालेल्या यात्रा उत्सवातील रीतीरीवाज, यात्रेचे नियोजन, तसेच अनेक सहकारी क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा या विशेष अंकाचे अंतर्गत प्रकाशित करण्यात आले आहेत. या विशेषांकाचे प्रकाशन पंच कमिटीचे तसेच यात्रा कमिटीचे प्रमुख बळीराम पाटील, रघुनाथ फाटके, विनायक पाटील, राजाराम हुंदरे, प्रकाश पाटील, हुवप्पा पाटील, हनुमंत पाटील या सह शिक्षक युवराज पाटील यासह अनेक पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
श्री महालक्ष्मी यात्रेला भाविकांची गर्दी!

गेल्या बुधवारपासून सुरू असलेल्या या महालक्ष्मी यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सायंकाळी चार नंतर श्री महालक्ष्मी यात्रेच्या ठिकाणी गर्दीचा महापूर होत आहे या ठिकाणी दुकानांची उत्तम मांडणी करण्यात आली आहे शिवाय गदगा मंदिर या ठिकाणी उत्तम आरास व सजावट करून पंच कमिटीने एक आकर्षक देखावा निर्माण केला आहे. त्या यात्रेला उद्या रविवारी पुरेपूर गर्दी होण्याची शक्यता आहे. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या यात्रेची सांगता गुरुवारी होणार आहे.







