IMG_20230710_181038
  • खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी
  • :खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगांव जिल्हा आदर्श शिक्षक व निमलष्करी दलात नियुक्त झालेल्या खानापूर तालुक्यातील मराठी तरुणींचा तसेच चांद्रयान-३ २०२३ या मोहिमेत यशस्वी झालेल्या इस्रोचे कनिष्ठ शास्त्रज्ञ श्री प्रकाश पेडणेकर यांचा सत्कार करण्याचे आयोजिले आहे. खानापूर तालुक्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
  • १) श्री सुरेश बाबू घुघ्रेटकर (मुख्याध्यापक- मराठा मंडळ हायस्कूल, कापोली)
  • २) श्री तुकाराम लक्ष्मण सुतार (मुख्याध्यापक- सह्याद्री हायस्कूल, गोधोळी)
  • ३) श्री मष्णू विठोबा चोर्लेकर (मुख्याध्यापक- लोअर प्रायमरी मराठी शाळा, मुडेवाडी)
  • ४) श्री ज्योतिबा शंकर गुरव (मुख्याध्यापक- हायर प्रायमरी मराठी शाळा, मोदेकोप)
  • ५) श्री पुंडलिक ईश्वर कुंभार (सहशिक्षक- हायर प्रायमरी मराठी शाळा, माळअंकले)
  • तसेच श्री महेश विष्णू सडेकर (मुख्याध्यापक- जांबोटी हायस्कूल, जांबोटी) जायन्ट्स ग्रुप ऑफ मेन बेळगांव यांच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
  • तसेच निमलष्करी दलात दाखल झालेल्या
  • १) कु रोहिणी मारुती नांदुरकर, लक्केबैल
  • २) कु ललिता जक्काप्पा गुरव, गणेबैल
  • ३) कु अश्विनी निंगाप्पा पाटील, खैरवाड
  • ४) कु योगिता पोमाणी नाळकर, तिवोली
  • ५) कु सोनाली महाराज घाडी, होनकल
  • ६) कु अश्विनी भुपतराव देसाई, हेम्माडगा
  • ७) कु संयुक्ता गोपाळ गुंडपकर, मास्केनहट्टी
  • ८) कु पुजा नारायण हुंद्रे, गर्लगुंजी
  • ९) कु राणी नामदेव पाटील, करंबळ
  • १०) कु माधुरी मल्लाप्पा अंधारे, यडोगा
  • ११) कु मयुरी मल्लाप्पा अंधारे, यडोगा
  • तसेच वय ७ वर्षे ते १२ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बनवलेल्या ब्रैनोब्रैन या राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय परिक्षेत यश मिळविल्याबद्दल कु सिध्दी उत्तमराव कदंब-पाटील, गर्लगुंजी हिचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथील माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण सभागृहात आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमासाठी समितीचे कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी आणि तालुक्यातील समस्त मराठीप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव बळवंतराव देसाई, कार्याध्यक्ष श्री मुरलीधर गणपतराव पाटील व श्री निरंजनसिंह उदयसिंह सरदेसाई तसेच सरचिटणीस श्री आबासाहेब नारायणराव दळवी कळवितात.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us