बेळगाव :
दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते रमाकांत कोंडुस्कर यांची शनिवारी येथील रेल्वे ओव्हर ब्रिज मराठा मंदिर बेळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घोषित करण्यात आले. दक्षिण मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 87 सदस्यांची निवड कमिटी नियुक्त करण्यात आली होती. समितीकडे सात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यातून वल्लभ गुणाजी यांनी रमाकांत कोंडुस्कर यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला तसेच माजी आमदार मनोहर किणेकर, आप्पासाहेब गुरव, ऍड. रतन मासेकर, रवी साळुंखे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
तत्पूर्वी रमाकांत दादा कोंडुस्कर, ऍड. रतन
मासेकर, शुभम शेळके, रवी साळुंखे आदींसह
जनतेचे जनमत घेण्यात आले व दक्षिण
मतदारसंघातील जनमत विचारात घेता रमाकांत कोंडुस्कर यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून करण्यात आले. घोषित हिंदुत्ववादी विचारसरणीचे रमाकांत कोंडुस्कर हे कुशल संघटक म्हणून ओळखले जातात युवा वर्गांमध्ये रमाकांत कोंडुस्कर यांच्याबद्दल एक आदराचे स्थान आहे. त्यांच्या पाठीशी युवा कार्यकर्त्यांचा ताफा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. रमाकांत कोंडूस्कर हे समाज सेवेत नेहमीच अग्रभागी असतात. त्याचप्रमाणे श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केलेली आहे. रमाकांत कोंडुस्कर यांच्या उमेदवारीमुळे दक्षिण मतदार संघामध्ये विशेषतः तरुण वर्गांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. या निवड प्रक्रिये वेळी गोंधळ होऊ नये, म्हणून बराच पोलीस फौज फाटा ही उभारण्यात आला होता.