खानापुर प्रतिनिधी:
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रचारात आघाडी घेतली असून समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आज गुरुवारी समितीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ मणतूर्गा गावचे सुपुत्र व माजी आमदार स्वर्गीय अशोकराव पाटील यांचे बंधू श्री दीपक नारायण पाटील यांनी 5001 रुपयाची देणगी देऊन सहकार्य केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, सचिव सिताराम बेडरे, कोषाध्यक्ष संजय पाटील, समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर, निरंजन सरदेसाई, गोपाळ पतील, डी एम गुरव गोपाळ हेब्बाळकर, ईश्वर बोबाटे प्रल्हाद मादार, संजय देवलकर, प्रदीप पाटील शिवाजी पाटील गुंडू गुरव सह समिति कार्यकर्ते उपस्थित होते.
खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीला देणग्या देऊन समितीचा उमेदवार निवडीचा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे मागील निवडणुका देखील अनेकांनी देणग्या देऊन समितीला सहकार्य केले आहे.आज म ए समिती एकीच्या झेंड्याखाली आली असून समितीचे बळ वाढले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात महाराष्ट्र एकीकरण समिती तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून समितीचा झेंडा अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने चंग बांधला आहे. त्यामुळे कार्यकारणी समिती निवड समिती व सुखानू कमिटीच्या मार्फत वेगवेगळी रणनीती आखली जात आहे.