खानापुर/ प्रतिनिधि: खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची अधिकृत उमेदवारी विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांना घोषित करण्यात आली आहे .
शनिवारी येथील म. ए. समिती संपर्क कार्यालयात 62 सदस्यांच्या निवड कमिटीची बैठक झाली. व मतदान यंत्रणेद्वारे निवड करण्याचा निकष ठरवण्यात आला.
खानापूर तालुका म. ए. समितीकडे पाच इच्छुकानी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये निरंजन सरदेसाई, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, रुक्माना झुंजवाडकर यांचा समावेश होता. प्रारंभी पाचही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवड कमिटीने पाच इच्छुकानी एकमत होऊन एकाची निवड करावी असा निकष शुक्रवारच्या बैठकीत करून वेळ देण्यात आला होता परंतु पाच उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर श्री विलास बेळगावकर यांनी मतदान प्रक्रियेत इच्छुकता दर्शवली नाही. व मतदान प्रक्रिये मधून नाव वगळावे अशी त्यांनी निवड कमिटीकडे विनंती केली. त्यानंतर उर्वरित चार मध्ये मतदान करण्यात आले. एकूण 62 निवड कमिटीच्या सदस्यांनी ऐच्छिक मतदान केले. मतदान प्रक्रियेत चार जणांची मतपत्रिका तयार करून योग्य उमेदवाराला मतदान करण्यासाठी 62 निवड कमिटी सदस्यांना अधिकार देण्यात आले. त्यानंतर सर्व निवड समितीच्या सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. या एकूण मतदान प्रक्रियेमध्ये मुरलीधर गणपतराव पाटील यांना बहुमत मिळाले. सदर अधिकृत उमेदवाराची घोषणा मय समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई सहकार्य करणे समिती व निवड समिती सदस्यांच्या उपस्थितीत सायंकाळी सातच्या दरम्यान करण्यात आली. या निवडीला सर्व इच्छुक उमेदवारासह उपस्थित कार्यकारणी व निवड समितीच्या सदस्यांनी अभिनंदन करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घोषणा दिल्या.