
खानापूर:
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 17 जानेवारी हा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला स्टेशन रोडवरील स्वर्गीय हुतात्मा नागाप्पा हुसूरकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव कारवार निपाणी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील , निरंजन सरदेसाई, चिटणीस आबासाहेब दळवी, खजिनदार संजीव पाटील, खजिनदार पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, अजित पाटील, बाळासाहेब शेलार, प्रकाश चव्हाण ,अरुण सरदेसाई, डी एम भोसले, जे एम पाटील, पुंडलिक पाटील, रूकमाना झुंजवाडकर, जयसिंग पाटील, तुळजाराम गुरव, रणजीत पाटील, रमेश धबाले, विलास बेळगावकर, पुंडलिक कारलगेकर, नारायण काकुलकर विठ्ठल गुरव, जगन्नाथ बिरजे यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर कोल्हापूर येथे होणाऱ्या धरणे आंदोलनात समितीचे अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते रवाना झाले.