खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: ऐन दिवाळीत पावसाचा धुमाकूळ! सुगीला आला व्यत्यय! भात पिके पाण्यात!
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: बुधवारी सायंकाळी अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे चुकीच्या हंगामात मोठा व्यत्यय आला असून अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेली भातपिके पाण्याखाली सापडली आहेत.
बुधवारी सायंकाळनंतर सुरू झालेल्या जोराच्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र पाणीत पाणी झाले. कापणी केलेली भात पिके पाण्याखाली सापडल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. हलगा,मेरडा नंदगड आदी भागात दुपारी तीनच्या दरम्यान जोराचा पाऊस झाला. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान खानापूर शहर परिसर धुवाधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. तालुक्यात सध्या सुगीचा हंगाम सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी माळवट जमिनीतील भात कापण्या गेल्या दोन-तीन दिवसात अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. पण अवकाळी पाऊस अचानकपणे सुरू झाल्याने कापणी केलेले अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेकांच्या मळण्या ही पावसात सापडल्या आहेत. वीज गडगडाटासह बराच काळ पाऊस पडल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पुढील काही दिवस हा पाऊस असाच राहायला तर भात पिकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.