खानापूर : जिद्द चिकाटी आणि कष्ट करायची तयारी असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कोठेही चमकू शकतो. अशी उदाहरणे आपल्याला समाजात पाहायला मिळतात. अशी माणसे नेहमी दुसऱ्यांसाठी रोल मॉडेल ठरतात. अशीच एक व्यक्ती जी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर आपल्या कर्तुत्वावर मात करून दुसऱ्यासमोर एक आदर्श निर्माण करत विश्वभारती कला क्रीडा संघटना स्थापन करून विविध उपक्रम राबवणारे संस्थापक अध्यक्ष, माजी सैनिक अनिल देसाई (हलशीवाडी ) यांच्या कार्याची दखल जनरल अफसर कमांडर इन चीफ त्या संस्थेने घेऊन त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आत्ताच हा सन्मान सोहळा पार पडला.
भारतीय सेनेचे पूर्वसैनिक आर्मी हवालदार अनिल देसाई सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणण्यास सहकार्य केले व अध्यक्षपद घेऊन कार्य पूर्ण केले. त्याचबरोबर शहिदांच्या दोन प्रवेशद्वार बांधण्याच्या जनजागृती करून पूर्णतास आणले. लहान मुलांना शिक्षणाबरोबर अभ्यासाची आवड खेळाची योग कला क्रीडा विविध स्पर्धा ची आवड व्हावी म्हणून जंगल दुर्गम भागामध्ये जनजागृती करून खेळ भरवले आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन इंटरनॅशनल मॅरेथॉन 2023 ला तिसरा चौथा पाचवा बारावा क्रमांक मिळवण्यात यश आणले आहे. सर्व सरकारी मातृभाषा शाळा टिकल्या पाहिजे जपल्या पाहिजे अभियान करत असतात. भारत देशाची एकता अखंडता एकात्मतासाठी कार्यरत असतात.
या कार्याची पोचपावती म्हणून लेफ्टनंट जनरल. शनिवार दिनांक 19 रोजी जनरल ऑफ चीप कमांडिंग इन चीफ दक्षिण कमान यांनी पारितोषक व मेडल देऊन मोठा सन्मान गौरव केलेला आहे.