
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात गुरुवारी होणार विजेत्यांचा सत्कार

फोटो : 1.प्रणव वंदुरे-पाटील 2.सुकृती येळ्ळूरकर 3.गौतमी डिचोलकर

1.चाळोबा अळवणी 2.ओम मन्नोळकर 3.प्रणाली चोपडे 4.जान्हवी पाटील
येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. 23) रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत प्राथमिक गटात मिलाग्रीज चर्च शाळेचा विद्यार्थी प्रणव वंदुरे-पाटील याने तर माध्यमिक गटात मराठा मंडळ हायस्कूल खानापूरचा विद्यार्थी चाळोबा अळवणी याने प्रथम क्रमांक पटकावला. गुरुवार दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे होणाऱ्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
प्राथमिक विभागातील विजेते : प्रणव वंदुरे-पाटील मिलाग्रीज चर्च शाळा प्रथम, सुकृती येळ्ळूरकर मिलाग्रीज चर्च शाळा द्वितीय, गौतमी डीचोलकर सरकारी प्राथमिक मराठी शाळा ओलमणी तृतीय, विशाल देसाई मराठी शाळा गर्लगुंजी चौथा, वेदांत ठोंबरे मिलाग्रीज चर्च शाळा पाचवा, सृष्टी कुंभार मराठी शाळा गर्लगुंजी सहावा, समीक्षा चौरी मराठी शाळा हत्तरगुंजी, लावण्या हरदाळकर मराठी शाळा बरगाव, सिद्धीका पाटील मराठी शाळा बरगाव, किरण गावडे मराठी शाळा कबनाळी, श्रेयस पाटील मराठी शाळा होनकल सर्वजण सातवा.
माध्यमिक विभागातील विजेते पुढील प्रमाणे : चाळोबा अळवणी मराठा मंडळ हायस्कूल खानापूर प्रथम, ओम मन्नोळकर मराठा मंडळ खानापूर द्वितीय, प्रणाली चोपडे गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूल इदलहोंड, जान्हवी पाटील ताराराणी हायस्कूल खानापूर दोघीही तृतीय, प्रथमेश जांबोटकर माध्यमिक विद्यालय जांबोटी चौथा, निकिता चौरी ताराराणी हायस्कूल खानापूर, सोनाली दळवी ताराराणी हायस्कूल खानापूर दोघीही पाचवा, अनुष्का पाटील ताराराणी हायस्कूल खानापूर सहावा, विजय दळवी मराठा मंडळ खानापूर, सारिका सुतार ताराराणी हायस्कूल खानापूर, कोमल देसाई मणतुर्गा हायस्कूल, स्वाती शिवठणकर मणतुर्गा हायस्कूल, युवराज साबळे मराठा मंडळ खानापूर सर्वजण सातवा क्रमांक पटकाविला आहे.