IMG-20250322-WA0025

*खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील हलगा येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. शनिवारी येथील लक्ष्मी मंदिर मध्ये संपूर्ण ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली व या बैठकीमध्ये सर्वांमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवण्यात आले.

हलगा ग्रामपंचायत सदस्य रणजीत कलाप्पा पाटील यांनी मंदिर श्री महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्वार व्हावा असा विषय व्यक्त केला त्याला हलगा ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा देऊन आजच्या झालेल्या मीटिंगमध्ये सर्वानुमते श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्वार करून लवकरात लवकर मंदिर बांधकामाला सुरुवात व्हावी असा संकल्प करण्यात आला. त्यावेळी हलगा गावातील वतनदार मंडळी व गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते. यामध्ये हलगा ग्रामपंचायत नूतन चेअरमन सुनील मारुती पाटील, कल्लाप्पा फटाण नागेशी फटाण माजी ग्रामपंचायत सदस्य, तुकाराम फटाण पि.के.पि. स. सदस्य,एम.जि.पाटील निवृत्त शिक्षक, अमृत फटाण माजी ग्रामपंचायत सदस्य,हणमंत पाटील, वसंत सुतार, प्रमोद सुतार, पुंडलिक पाटील,गंगाराम फटाण, लक्ष्मण बिस्टेकर, ओमाना केसरेकर,गोपाळ ईश्राण, धाक्लोजी बिस्टेकर, विजय ईश्राण, सुरेश रुपण, बाबू गुरव ज्ञानेश्वर सनदी व उपस्थित गावकऱ्यांच्या सर्वानुमते महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करण्यात आला.

सोमवार दिनांक 24/3/2025 रोजी श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कमिटीची निर्मिती करून मंदिराच्या कार्य सुरू करण्यात येईल त्यासाठी हलगा गावातील जे कामानिमित्त बाहेरगावी आहेत त्यांनी सोमवार दिनांक 24/3/ 2025 रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता मंदिरामध्ये उपस्थित राहून जीर्णोद्वार करण्याच्या संकल्प मध्ये आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थितीत राहावे असा असा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहून नवीन संकल्पना चालना द्यावी असे ठरविण्यात आले

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us