
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर नंदगड या खानापूर – तालगुपा या राज्य मार्गावरील लालवाडी क्रॉस जवळ एक धोकादायक भले मोठे आंब्याचे झाड जुनाट झाले असून ते सुसाट वाऱ्यामुळे कधी कुणाच्या अंगावर कोसळेल सांगता येत नाही. यासाठी संबंधित विभागाने सदर धोकादायक झाड हटवावे. अन्यथा संभाव्य धोक्यास जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवासी वर्गातून केला जात आहे. खानापूर तालगुपा राज्य मार्गावर अनेक जुनाट झाडे आहेत. या जुनाट झाडामुळे अनेक वर्ष वेळा पावसाळ्यात किंवा अवकाळी पावसाच्या वेळी झाडे तोडून पडण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे या राज्यमार्गावरील अनेक जुनाट झाडे हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने निविदाही घेतली होती. परंतु संबंधित कंत्राट दराला वन खात्याकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नसल्याने ती झाडे हटवण्यास विलंब होत आहे. लालवाडी वळणावरील चापगाव- कारलगा भागात जाणाऱ्या अनेक नागरिकांची त्या ठिकाणी रेलचेल असते. शिवाय अनेक व्यावसायिक दुकाने आहेत. सदर आंब्याचे झाड भले मोठे वाळल्यामुळे ते कधी कोसळेल सांगता येत नाही. मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे झाडाच्या अनेक डहाळ्या तुटून पडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पावसाळा किंवा वादळ आले की येथील लोकांना जीव टांगणीला लागतो. यासाठी सदर झाड तातडीने हटवण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावेत अशी मागणी येथील व्यवसायिकांनी केली आहे.
मंगळवारी सायंकाळी वीज गडगडात सह खानापूर तालुक्याच्या विविध भागात पाऊस झाला. उनाने त्रासलेल्या नागरिकांना या पावसाने दिला आहे. सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. परंतु मंगळवारी ढग दाटून आले मात्र सुसाट वाऱ्यामुळे सर्वत्र पाऊस कमी झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी गारपीट झाली.