IMG_20241109_215328

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: कारलगा गावच्या दक्षिणेकडील डोंगरीकडील असलेल्या कसलेकोड शिवारात चरावयास बांधलेल्या एका म्हशीच्या रेडकाचा जंगली वाघुटाने फडशा पाडण्याची घटना शनिवारी दुपारी उघडकिस आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगराच्या पायथ्यासी या शेतीवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या, वाघुट असल्याची भीती आहे. या भागात अनेक वेळा बिबट्याचे दर्शनही झाले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास सुगीचे हंगाम असल्याने शेतकरी आपली जनावरे घेऊन शेतीत गेले होते. ಶನಿವಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕರಲಗಾ ಗ್ರಾಮದ ಗುಡ್ಡದ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಕಾಸನಕೋಡು ಹೊಲದಲ್ಲಿ ಎಂಬಲ್ಲಿ ಮೇಯಲು ಬಂದಿದ್ದ ಎಮ್ಮೆಯ ಕಾಡು ಹಂದಿಯೊಂದು ತುಳಿದಿರುವ ಘಟನೆ ಶನಿವಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಇದರಿಂದ ಈ ಭಾಗದ ನಾಗರಿಕರಲ್ಲಿ ಭಯದ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ಬೆಟ್ಟದ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿರುವ ಈ ಕೃಷಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕಳೆದ ಹಲವು ದಿನಗಳಿಂದ ಚಿರತೆ, ಹುಲಿಗಳ ಭೀತಿ ಇದೆ. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಚಿರತೆಗಳೂ ಹಲವು ಬಾರಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿವೆ. ಶನಿವಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಸುಮಾರಿಗೆ ಸುಗ್ಗಿಯ ಕಾಲವಾದ್ದರಿಂದ ರೈತರು ಜಾನುವಾರುಗಳೊಂದಿಗೆ ಜಮೀನಿಗೆ ತೆರಳಿದ್ದರು.ಅಶೋಕ್ ಮಾರುತಿ ಘಾಡಿ ಕಾರಲುಗಾ , ಅರಣ್ಯದ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿರುವ ಅಣೆಕಟ್ಟಿಗೆ ಮೂರು ವರ್ಷದ ಎಮ್ಮೆ ರೆಡ್ಕವನ್ನು ಕಟ್ಟಿ ಭತ್ತ ಕಟಾವು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ ಏಕಾಏಕಿ ದಾಳಿ ಮಾಡಿದ ಹುಲಿ ಅಥವಾ ಚಿರತೆ ರೆಡ್ಕವನ್ನು ಕೊಂದು ಹಾಕಿದೆ ಆಗಿದೆ

कारलगा येथील अशोक मारुती घाडी जंगलाच्या पायथ्याशी बांधावर तीन वर्षाच्या एका म्हशीच्या रेडकाला बांधून भात कापणी करत असताना अचानक त्या ठिकाणी एका वाघुटाने की बिबट्याने हल्ला करून त्या रेडकाचा पडसा पाडला आहे. भात कापणीच्या नादात असलेल्या त्या शेतकऱ्यांना काही लक्षात आले नाही. पण जेवणाच्या सुट्टी वेळी पाहिले असता आपले म्हशीचे रेडकू रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर रेडकाचा फडशा वाघाने पाडल्याचा संशय निर्माण झाला. पण या जंगलात खरोखर वाघ आहे का ? हा प्रश्न निरुत्तरित आहे. पण या जंगलात वाघुट , अस्वले व बिबट्या वावरताना अनेक वेळा दिसून आले आहे. त्यामुळे त्या रेडकाचा पडसा वाघुटाने किंवा बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या सदर्भात वन खात्याला सदर शेतीमालकानी कळवले असून सायंकाळपर्यंत वन खात्याचे कोणीच अधिकारी आले नाहीत. रविवारी सकाळी पाहणी करण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून हाडलगा, खैरवाड जंगलात एका बिबट्याचा संचार आहे. चार दिवसांपूर्वी हडलगा येथील एका माजी सैनिकाच्या बकऱ्याचा त्या बिबट्याने फारश्या पडला होता. सदर बिबट्या दोन दिवसापूर्वी रात्री साडेआठच्या सुमारास हाडलगा गावच्या वेशीत चापगाव येथील उळवेश अगडी हे बेकवाड मार्गे चापगावला येत असताना त्यांच्या दुचाकीला बिबट्या आला होता. त्यामुळे सदर बिबट्या हाडलगा, खैरवाड , शिवोली, आलेहोळ,, कारलगा या जंगलात गेल्या पंधरा दिवसापासून वावरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या रेडकाचा पडसा त्याच बिबट्याने पाडला असावा का असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. वन खात्याच्या अधिकारी आणि पहाणी केल्यानंतर रेडकाच्या मृत्यू झालेल्या ठिकाणी लागलेले ठसे व तपासणीनंतरच तो वाघ आहे की बिबट्या आहे हे कळणार आहे. एकंदरीत या जंगली प्राण्याच्या वावरामुळे जंगलपट्ट्यातील शेतकऱ्यांत मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us