Screenshot_2025-12-14-13-02-50-91_a23b203fd3aafc6dcb84e438dda678b6

म्हापसा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

बेळगाव गर्भवती जिल्ह्यातील महिलेने रंकाळा तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. नेहा ज्ञानेश्वर पवार (वय २७ कणकुंबी, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे.

मूळचे बेळगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वर हे पत्नी नेहासह म्हापसा गोवा येथील एका बांधकामाच्या साईटवर कामाला आहेत. नेहा ही साडेपाच महिन्यांची गर्भवती होती. शुक्रवारी सकाळी ती म्हापसा येथील घरातून कोणाला न सांगता बाहेर पडली. त्यामुळे ज्ञानेश्वर व तिच्या आई-वडिलांनी शोध घेतला. पण नेहा सापडली नाही. यानंतर म्हापसा येथील पोलीस ठाण्यात पती ज्ञानेश्वर यांनी शनिवारी सकाळी नेहा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, शनिवारी सकाळी रंकाळा तलावात तिचा मृतदेह आढळून आल्यावर जुना राजवाडा पोलिसांना उपलब्ध झालेल्या मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी तिचा पती ज्ञानेश्वर व तिच्या आई वडिलांशी संपर्क करून माहिती दिली. यानंतर रात्री उशिरा तिच्या नातेवाईकांनी नेहाचा मृतदेह ताब्यात घेतला. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us