बंगलोर:कर्नाटकच्या बहुतांश भागात 2 दिवस मुसळधार पाऊस पडणार असून, 6 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण कन्नड, उडुपी, चामराजनगर, हसन, मंड्या, म्हैसूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. असा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे.
उर्वरित उत्तर कन्नड, बागलकोट, बेळगाव, धारवाड, गदग, कोप्पल, रायचूर, विजयपूर, बेल्लारी, बेंगळुरू ग्रामीण, बंगळुरू शहर, चिक्कबल्लापूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, कोडागू, कोलार, रामनगरा, शिमोगा तुमकूर, विजयनगरमध्ये पाऊस पडेल. बिदर, कलबुर्गी, यादगिरी येथे कोरडा हवामान कायम राहणार आहे.
बहुतेक किनार्यावर आणि दक्षिणेकडील आतील भागात पाऊस पडला, तर उत्तरेकडील आतील भाग कोरडा होता. कोटा, होन्नावर, मानकी, मंगलोर, कुमटा, उडुपी, कुंदापूर, कारवार, यल्लापूर, कमरडी, हुंचडाकट्टे, बलेहोन्नूर, जयपूर, पुत्तूर, कलसा येथे पाऊस झाला.
विजयपुरा येथे सर्वात कमी 13.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किनारपट्टीच्या अनेक भागात, दक्षिणेकडील काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. बेंगळुरूमध्ये ढगाळ वातावरण, आज काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.