Screenshot_20230718_210346

लोंढा /प्रतिनिधी : रोजंदारीसाठी दररोज रेल्वेमधून वडापावचा धंदा करून उपजीविका जगणाऱ्या एका वडापाव चाय, वाल्याचा रेल्वेत चढताना पाय घसरल्याने पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे.
सदर दुर्दैवी व्यक्तीचे नाव सद्दाम शब्बीर सोलापुरी (वय 30, रा. लोंडा) असे आहे.
मृत सद्दाम हा दररोज लोंडा स्थानकावरून जाणाऱ्या गाड्यांमध्ये चहा-कॉफी विकायचा. रविवारी दुपारी चालत्या ट्रेनच्या एका डब्यातून उतरून दुसऱ्या डब्यात चढत असताना त्याचा पाय रेल्वे रुळ आणि फलाटाच्या भिंतीमध्ये घसरला. रेल्वे खाली आल्याने गंभीर जखमी झाला होता. स्थानिक नागरिक व रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी प्रयत्न केले, पण 108 ॲम्बुलन्स वेळीच आली नसल्याने एका खाजगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. पण उपचार अभावी त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

लोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

वास्तविक लोंडा हे बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. या ठिकाणी लोकवस्ती ही तशीच आहे. त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी ये जा करतात.रेल्वे स्थानकावर नेहमी गर्दी असते. त्यामुळे या भागात असे अपघाताचे अनुचित प्रकार अनेक वेळा घडत आले आहेत. पण या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभाव व शासकीय सुविधा नसल्याने अनेक वेळा रुग्णांच्यावर उपचाराअभावी गैरसोय होताना दिसते. या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बेजबाबदारपणामुळे या ठिकाणी आरोग्य कवच वाहीकाही वेळीच नसते. अशाच प्रकारे लोंढा रेल्वे स्थानकावर अपघात झालेल्या या व्यक्तीला वेळीच शासकीय रुग्णाला दाखल करण्यासाठी 108 आरोग्य कवितेला पाचारण करण्यात आले. परंतु तब्बल दोन तासांनी त्या ठिकाणी आरोग्य कवच वाहीका आली तोपर्यंत त्याला खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले होते. पण वेळीच उपचार झाला नसल्याने त्याचा मृत्यू झाला. यामुळे एका गरीब कुटुंबाचा एक आधारवडच हरपल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने व रेल्वे खात्याने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांनी केली आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us